पुण्यापाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी हिट अँड रनच्या केसेस घडताना दिसत आहेत. कारण पुन्हा एकदा एका भरधाव कारने फुटपाथवरील ९ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील नागपुरात हिट अँड रनची घटना घडली होती. आता पुन्हा अशीच भयंकर घटना घडल्याने नागपुरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेवत २ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
नागपुरात घडलेल्या या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. परिणामी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून ड्रंक अँड ड्राइव्हची मोहीम अधिक तीव्र करावी असे आदेश फडणवीसांनी दिले आहेत.