अदानी समूह भारतासह परदेशात देखील मोठी गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आपल्या शेजारी असलेल्या भूतान देशात देखील अदानी समूह गुंतवणूक करणार आहे. अदानी समूह भूतानमध्ये ग्रीन हायड्रो प्लांट उभारणार आहे. यासंदर्भातील करार अदानी समूहाने भूतानशी केले आहे. भूतानमध्ये उभा रहाणारा ग्रीन हायड्रो प्लॅन हा ५७० मेगावॅटचा प्रकल्प असणार आहे.
या प्रकल्पासंदर्भात गौतम अदानी यांनी भुतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली होती. तसेच देशात पायाभूत सुविधांबाबत देखील चर्चा करण्यात आली. गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.