NEET परीक्षेतील अनियमितता प्रकरणाशी संबंधित दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न विचारले. तसेच NTA आणि केंद्राला फटकारले. यावर सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावून या प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्याच्या 0.001 टक्के निष्काळजीपणावरही पूर्णपणे कारवाई केली पाहिजे. न्यायालयाने एनटीए आणि केंद्राकडून उत्तरे मागवली आहेत. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही आजच आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ०.००१ टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुलांनी अभ्यास केला आहे, त्यांची मेहनत आपण विसरू शकत नाही.
NEET प्रकरणात अमुल्य विजय पिनापती आणि नितीन विजय यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये NEET पेपर फुटल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) उच्च न्यायालयात नॅशनल मेडिकल कमिशनने दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसह विविध पैलूंवर दाखल झालेल्या सुमारे डझनभर याचिकांवर येत्या ८ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.