मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान ओबीसी समजावर अन्याय होऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी देखील आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान जरांगे पाटलांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. हाके यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जारांगे पाटलांनी केली आहे. तसेच आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
भारतात लोकशाही आहे. त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची जी मागणी आहे त्यांना करुदेत. मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. मात्र हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असे दिसून येत आहे. कधीही न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.