हरियाणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या किरण चौधरी आणि त्यांची मुलगी श्रुती चौधरी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कालच दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
यावेळी किरण चौधरीनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे . म्हणाल्या की,हरियाणात काँग्रेस व्यक्ती केंद्रित झाली आहे.ज्यामुळे पक्ष कधीच पुढे जाऊ शकत नाही.
या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सून आहेत.जे भिवानी जिल्ह्यातील तोशामचे आमदार आहेत. तर श्रुती चौधरी या काँग्रेसच्या हरियाणा युनिटच्या कार्यकारी अध्यक्षाही होत्या.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी पक्षाला केलेला रामराम काँग्रेसला हरियाणामध्ये महागात पडण्याची शक्यता आहे.