श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी पहाटे श्रीलंकेच्या पाण्यात मासेमारीसाठी गेलेल्या चार भारतीय मच्छिमारांना अटक केली आणि त्यांची बोट जप्त केली आहे. यासोबतच या वर्षात आतापर्यंत १८० हून अधिक भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतीयांकडून कथित मासेमारीच्या या ताज्या घटनेत, मंगळवारी पहाटे जाफना द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील डेल्फ्ट आयलँडजवळ एक बोट जप्त करण्यात आली आणि चार मच्छिमारांना अटक करण्यात आली.
मंगळवारच्या अटकेसह, या वर्षी आतापर्यंत एकूण १८२ भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या पाण्यात कथित बेकायदेशीर मासेमारीसाठी अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या २५ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत, असे नौदलाने सांगितले. गेल्या वर्षी अशा सुमारे २४०-२४५ अटक करण्यात आल्या होत्या. दोन्ही देशांतील मच्छिमारांचे आवडते मासेमारीचे ठिकाण असलेल्या पाल्क सामुद्रधुनीमध्ये अशा बहुतांश घटना घडतात. ही सामुद्रधुनी तमिळनाडूला श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागापासून वेगळे करते. श्रीलंकेच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सांगितले की, भारतीयांच्या कथित बेकायदेशीर मासेमारीच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर २० जून रोजी येथे येतील तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली जाईल.