आज मुंबईत उद्धव बाळासाहबे ठाकरे शिवसेना गटाचा ५८ वा वर्धापन दिन साजरा झाला. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन सोहळा पार पाडला. येवले उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि प्रमुख नेते व पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांच्यासह अनेकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, ”येत्या २ -३ महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आज आपल्या सर्वाना उद्धव साहेब त्याबद्दलचा आदेश देणारच आहेत. आम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही आम्हाला पाठविणार आहात. आपल्या पक्षाला ५८ वर्षे झाली. या ५८ वर्षांमध्ये जो-जो आपल्या अंगावर आला, त्याला-त्याला आपण शिंगावर घेतले आहे. ज्याला आपण मोठे केले त्याला मस्ती आल्यावर त्याला आपण त्याची जागा देखील दाखवली.”
दरम्यान आजच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसेच नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. यावेळी भाष्यकार जाधवांनी लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत देखील भाष्य केले. तसेच ठाकरेंच्या आदेशाचे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पालन करू असे भास्कर जाधव यांनी सांगितले.