आज मुंबईत शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. वरळीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार, नवनिर्वाचित खासदार आणि पदाधिकारी तसेच हजारो कार्यक्रते उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुरु केले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यावरून ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थिताना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातना तुम्हाला कमी मताधिक्य मिळालं जे सुद्धा एकदम फक्त सहा हजाराची लीड तुम्हाला मिळवता आली. 50 हजाराचा लीड येथून घेणार असा दावास उभाता गटाचे नेते करत होते मात्र आता तुम्ही तिथून कसे लढणार तुम्हाला आता भेंडी बाजार मधून लढावं लागेल मतदार संघात नाही पत आणि माझं नाव गणपत अशी तुमची अवस्था झाली आहे. “
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते यापुढे असे घडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे वेळीच सावध झाले पाहिजे अल्पसंख्यांकांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे कधीच नव्हते आम्हीही नव्हतो कधीच नव्हतो आपल्या कितीतरी कार्यकर्ते अल्पसंख्यांक समाजाचे आहेत बाळासाहेबांचा विरोध होता तो वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाला.” एकनाथ शिंदे अनेक मुद्द्यांवरून ठाकरे गटावर टीका केली.