कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023, च्या जागतिक बँक आणि एस अॅन्ड पी ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्स यांनी तयार केलेल्या अहवालानुसार भारतातील तब्बल 9 बंदरांनी जगातील पहिल्या 100 बंदरांमध्ये मध्ये स्थान मिळवल्याचे कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स (CPPI), 2023 च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आवृत्तीत म्हटले आहे. त्यामुळे भारताच्या बंदर विकास कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळाली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या महत्त्वाकांक्षी सागरमाला कार्यक्रमाला याचे श्रेय दिले आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले,“भारतीय बंदरांची ही मोठी कामगिरी आहे, तसेच बंदरांची कामगिरी सुधारण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या परिश्रमांचा हा दाखला आहे. परिचालनामधील कार्यक्षमता आणि सेवा वितरणाद्वारे जहाजे आणि मालवाहतूक कार्यक्षमतेने हाताळण्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या संदर्भात सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, भारतीय सागरी क्षेत्र सागरी प्रवेशद्वारांची लवचिकता आणि कार्यक्षमता आणखी सुधारेल आणि बंदरांच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासाला चालना देईल”.
2023 मध्ये विशाखापट्टणम बंदराने जगातील शीर्ष 20 बंदरांमध्ये 19 क्रमांकावर स्थान मिळवले, तर मुंद्रा बंदर देखील सध्याच्या क्रमवारीत 27 व्या क्रमांकावर पोहोचले.तर 100 मध्ये स्थान मिळविलेल्या इतर सात भारतीय बंदरांमध्ये पिपावाव (यादीत 41 वा क्रमांक), कामराजर (47), कोचीन (63), हजीरा (68), कृष्णपट्टणम (71), चेन्नई (80) आणि जवाहरलाल नेहरू यांचा समावेश आहे.