बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का दिला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाटणा हायकोर्टाने रद्द ठरवलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार सरकारने शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण दिले होते.
दरम्यान आरक्षणाची टक्केवारी वाढविण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीय सर्वेक्षण केले होते. तेव्हा ते आरजेडी आणि काँग्रेससोबत सरकारमध्ये होते. त्यानंतरच नितीश कुमार यांच्या सरकारने मागास, अतिमागास, एससी आणि एसटीचं आरक्षण 65 टक्के करण्याचा आदेश काढला होता. यावरून त्यांचा निर्णय कोर्टात टिकणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याप्रमाणेच घडले असून, पाटणा हायकोर्टाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा हा निर्णय रद्द ठरवलं आहे. त्यामुळे नितीश कुमारांना मोठा धक्का बसलं आहे. आता हे आरक्षण वाचविण्यासाठी नितीश कुमारांचे सरकार कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.