tata aia delair bonus
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. (Tata AIA) ही भारतातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक कंपनी असून, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी सहभागी (PAR) पॉलिसीधारकांसाठी INR 1,465 कोटींचा बोनस घोषित केला आहे. हे बोनस पेआउट कंपनीने दिलेले आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. FY23 मध्ये दिलेल्या INR 1,183 कोटी रुपयांच्या बोनसच्या तुलनेत यंदा त्यात 24 टक्के वाढ झाली आहे.
टाटा एआयएची मजबूत गुंतवणूक व्यवस्थापन क्षमता आणि मजबूत जोखीम व्यवस्थापन पद्धती यांमुळे सहभागी पॉलिसीधारकांना सातत्याने जास्त बोनस मिळत आहेत. हे देखील एक कारण आहे की कंपनीला त्यांच्या ग्राहकांचा विश्वास आहे, कारण ते त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करत आहेत. FY24 मध्ये, टाटा एआयएने 13वा महिना (89.40%), 25वा महिना (80.70%), 37वा महिना (75.00%) आणि 49वा महिना (73.10%) सातत्याने पर्सिस्टन्सीचे उत्तम कार्यप्रदर्शन करत (प्रिमियमवर आधारित) 4 गटांमध्ये #1 क्रमांकावर येत उद्योगात अग्रणी स्थान प्राप्त केले. पर्सिस्टन्सी रेशो पॉलिसीधारकांची टक्केवारी दर्शवते जे दरवर्षी त्यांच्या जीवन विमा पॉलिसीचे नूतनीकरण करतात, ब्रँडवर त्यांची निष्ठा आणि विश्वास दर्शवतात.
टाटा एआयएचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि नियुक्त एक्च्युअरी क्षितिज शर्मा म्हणाले, “आणखी एका वर्षी आमच्या सहभागी पॉलिसींमध्ये उत्कृष्ट बोनस पेआउट वितरीत करताना आम्हाला आनंद होत आहे. टाटा AIA ची विक्रमी बोनस घोषणा आमच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या विश्वासासाठी पुरस्कृत करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. आमच्या पॉलिसीधारकांना उत्कृष्ट परतावा देणे हा आमचा सतत प्रयत्न आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना चिंतामुक्त जीवन जगता येते आणि त्यांच्या प्रियजनांबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतात..”
टाटा एआयए अनेक सहभागी उत्पादनांची श्रेणी ऑफर करते जी ग्राहकांना संपत्ती जमवण्यास किंवा उत्पन्न मिळविण्यात, त्यांचे कुटुंब सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. ही उत्पादने जीवन विमा संरक्षण, उत्पन्न, तसेच बोनसच्या रूपात नियमित किंवा एकरकमी लाभ देतात. बाजाराशी निगडित गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही जोखीम न घेता ग्राहक या उपायांद्वारे त्यांची गुंतवणूक वाढवू शकतात.