यंदाच्या वर्षी मान्सून देशासह राज्यात नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला आहे. मात्र मागील ६ ते ७ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता विश्रांती झाल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा बारसण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुण्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. राज्यात हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्यसरकार आणि प्रशासनाने केले आहे.