अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ईशा कोप्पीकरने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘इश्क समुद्र’ या कंपनीत ‘खल्लास’सारख्या आयटम साँगमध्ये काम केल्यानंतर ईशाने हिंदी चित्रपटसृष्टीत टाईपकास्ट होण्याबाबत मत व्यक्त केले आहे. इंडस्ट्रीतील तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल बोलताना ती भावूक झाली.
एका मुलाखतीत ईशा कोप्पीकर म्हणाली, “मी १८ वर्षांची होते. त्यावेळी एक प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या सेक्रेटरीने माझ्याशी संपर्क साधत सांगितले होते की, मला काम हवे असेल तर त्या अभिनेत्याशी जवळीक ठेवावी लागेल, तसेच त्याचे सेक्रेटरीही मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असत”
ती म्हणाली, “मी 23 वर्षांची असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या स्टारने मला खाजगीत बोलावले होते. मात्र या अभिनेत्याचे इतर अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याचीही अफवा पसरली होती. त्यामुळे मी त्याला भेटण्यास नकार दिला.”
हे सांगताना ईशा कोप्पीकरच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, “मी इतकी साधी आहे की एकदा एकता कपूरने मला कामासाठी विशिष्ठ वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्यास सांगितले ,होते. इंडस्ट्रीत टिकू शकणारे फार कमी लोक आहेत. मी त्यापैकी एक आहे.”
ईशा कोप्पीकर शेवटची तामिळ चित्रपट ‘आयलान’मध्ये दिसली होती. काही महिन्यांपूर्वी ईशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती.