आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी लोकसभा भवन संकुलात योगासनांचे नेतृत्व केले.
योगसाधनेनंतर उपस्थितांना संबोधित करताना बिर्ला यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, संपूर्ण जग भाग्यवान आहे की, प्राचीन भारतातील ऋषी-मुनींनी लोककल्याणासाठी मानवतेला योगाची अनमोल देणगी दिली.
जागतिक योग दिनाचा संदर्भ देत बिर्ला म्हणाले की, “आज योगाला जगभरात मान्यता मिळत आहे आणि योग हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ते म्हणाले की, योग हा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून तो मानवी जीवनाच्या सर्वांगीण आरोग्याचा पाया आहे. ते पुढे म्हणाले की योग मानवी जीवन, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि अध्यात्मिक विकासाच्या प्रमुख मुद्द्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते” .
योगाच्या कल्याणकारी पैलूंचा उल्लेख करताना बिर्ला म्हणाले की योग सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक सीमांच्या पलीकडे जातो. योगाने संपूर्ण जगाला एकत्र करण्याचे काम केले आहे जेणेकरून मानवी आरोग्याच्या क्षेत्रात दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम मिळू शकेल. बिर्ला म्हणाले की योग ही एक शक्ती आहे जी आपल्यामध्ये संतुलन स्थापित करते आणि आपल्याला कार्यक्षम, सक्रिय आणि आत्मनिर्भर बनवते”. ते पुढे म्हणाले की, योग म्हणजे आत्मविकासातून स्वावलंबनाचा अखंड प्रवास
दैनंदिन योगाभ्यासावर भर देताना बिर्ला म्हणाले की, “आजच्या काळात योग हा सर्व आजारांवर आणि उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय आहे. विविध आरोग्यविषयक आव्हानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग हे एक शक्ति”शाली माध्यम आहे. योग हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे वर्णन करताना बिर्ला म्हणाले की, हा अमूल्य वारसा पुढे नेणे आणि समृद्ध करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे”. यावेळी विद्यमान खासदार, माजी खासदार, लोकसभा सचिवालय आणि राज्यसभा सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.