पाकिस्तानमध्ये कुराणाची विटंबना केल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केली आहे. वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील स्वात जिल्ह्यात कुराणच्या कथित अपमानामुळे संतप्त जमावाने एका विदेशी पर्यटकाला जिवंत जाळून ठार मारले असल्याची बातमी समोर आली आहे.
पंजाबच्या सियालकोट जिल्ह्यातील गुरुवारी रात्री स्वातच्या मद्यान तहसीलमध्ये या विदेशी पर्यटकावर पवित्र कुराणची काही पाने जाळल्याचा आरोप करण्यात आला होता. संशयिताला ताब्यात घेऊन मदनगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमा झाला आणि त्याला ताब्यात देण्याची मागणी करू लागला. पोलिसांनी तसे करण्यास नकार दिल्यावर जमावाने गोळीबार सुरू केला.दरम्यान संशयिताला बाहेर खेचत आणून जाळण्यात आले व त्याचा अर्धा जळालेला मृतदेह झाडाला लटकवण्यात आल्याची माहिती स्वात जिल्हा पोलीस अधिकारी जाहिदुल्ला यांनी दिली आहे.
त्याला जाळण्यात येत असताना जमाव अल्लाहू अकबरच्या घोषणा देत होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया .उमटत आहेत. पाकिस्तानमध्ये ईशनिंदाच्या आरोपावरुन कट्टरपथींयानी एखाद्याची हत्या करण्याची ही पहिली वेळ नाही. याधी पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांनी पोलिसांना न जुमानता अनेक वेळेला ईशनिंदेच्या आरोपींची हत्या केली आहे. अनेकांना जाळून मारण्यात आले आहे.
इस्लाम किंवा पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात काहीही बोलल्यास किंवा केल्याबद्दल मृत्यूदंडाची तरतूद असल्याचे ईशनिंदा कायद्यात म्हटले आहे. फाशीची शिक्षा न दिल्यास आरोपीला दंडासह जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. या कायद्याचा पाया ब्रिटिश राजवटीत घातला गेला होता.