सध्या महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान हे सगळे सुरु असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. काल सह्याद्री अथितीगृहावर ओबीसी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर भाजपच्या कोअर कमिटीची देखील बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. काल रात्री ८ वाजता भाजपाची कोअर कमिटीची बैठक सुरु झाली होती. ही बैठक तब्बल ५ तास चालल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत लवकरच होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे. महाराष्ट्र भाजपायाकडून १० नावे फायनल करून त्यांची लिस्ट दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविली जाणार आहेत.