सध्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी ही स्पर्धा सुरु आहे. सध्या या स्पर्धेत सुपर ८ चे सामने सुरु झाले आहेत. दरम्यान काळ वेस्ट इंडिज विरुद्ध अमेरिका यांच्यात सामना झाला. वेस्ट इंडिजने शनिवारी केन्सिंग्टन ओव्हलवर यूएसएचा नऊ गडी राखून पराभव करून सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये पहिला विजय नोंदवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना USA संघ 19.5 षटकात केवळ 128 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने केवळ 10.5 षटकांत 1 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जखमी ब्रँडन किंगच्या जागी आलेल्या जॉन्सन चार्ल्स आणि शाई होपच्या साथीने वेस्ट इंडिज संघाला चांगली सुरुवात झाली. सौरभ नेत्रावलकरने पहिले षटक चांगले टाकले, पण पुढच्याच षटकात होपने नॉस्तुश केन्झिगेच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला आणि त्यानंतर त्याने चांगली फलंदाजी केली. होपच्या बॅटमधून चौकारांचा पाऊस सुरू झाला. दुसरीकडे चार्ल्सने फक्त स्ट्राइक रोटेट केला. होपच्या आक्रमक फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने पॉवरप्लेमध्ये 58 धावा जोडल्या. होपच्या डावातील सर्वोत्तम क्षण म्हणजे षटकारांची हॅट्ट्रिक, त्याने 9व्या षटकात मिलिंद कुमारच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन गगनचुंबी षटकार ठोकले.
यानंतर निकोलस पुरनने 11व्या षटकात सौरभ नेत्रावलकरला लागोपाठ दोन षटकार खेचले आणि त्यानंतर एकेरी घेत होपला स्ट्राइक दिली. या षटकातील पाचव्या चेंडूवर होपने षटकार खेचून वेस्ट इंडिजला नऊ षटक आणि एका चेंडूत नऊ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. होपने 39 चेंडूंवर नाबाद 82 धावांची जलद खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 8 षटकार मारले, तर पूरणने 12 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यूएसए संघाने पॉवरप्लेमध्ये स्टीव्हन टेलरची विकेट गमावल्यानंतर 48 धावा केल्या.