राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ओबीबी समाजासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या ९ दिवसांपासून वडीगोद्री (जालना) येथे आंदोलन करत आहेत. दरम्यान काल ओबीसी शिष्टमंडळाची आणि राज्य सरकारची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ हाके यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली.
उपोषणस्थळावरून बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ”आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यांना द्यायचे तर दुसरे ताट द्या. आमच्या ताटातले देऊ नका. लोकशक्ती एकत्रित आली तर धनशक्तीचा पराभव होईल. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आम्ही पाठिंबा देतो. शरीफ है हम. किसी से लडते नाही है. पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नाही है.” छगन भुजबळ असे म्हणतात समोर उपस्थित असलेल्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.