भारत आणि बांगलादेशने शनिवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या उपस्थितीत डिजिटल क्षेत्रातील भागीदारी आणि हरित भागीदारीसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील चर्चेनंतर भारत आणि बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी भारत आणि बांगलादेशमधील डिजिटल भागीदारीबाबत करारांची देवाणघेवाण केली. याशिवाय हरित भागीदारीबाबत करार, सागरी आणि ब्लू इकॉनॉमीवरील सामंजस्य करार, आरोग्य क्षेत्रातील सामंजस्य करार, अंतराळ क्षेत्रातील सामंजस्य करार, दोन्ही देशांमधील रेल्वेबाबत सामंजस्य करार, उभय देशांमधील समुद्र विज्ञान क्षेत्रातील सामंजस्य करार, सामंजस्य करार.
नवी दिल्लीत आपल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या एका वर्षात आम्ही 10 वेळा भेटलो असलो तरी आजची भेट विशेष आहे . कारण पंतप्रधान शेख हसीना आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पुन्हा भेटत आहेत. त्या आमच्या पाहुण्या आहेत.”
दोन्ही देशांमधील संबंध आणि गेल्या वर्षभरात घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकत मोदी म्हणाले गेल्या वर्षभरात आपण मिळून लोककल्याणाचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. अखौरा-अगरतळा दरम्यान भारत-बांगलादेशचा सहावा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक उघडणे आणि दोन्ही देशांमधील भारतीय रुपयातील व्यापाराची सुरुवात इत्यादींचा त्यांनी उल्लेख केला.” आपत्ती व्यवस्थापनावर दोन्ही देशांमध्ये नूतनीकरण, मत्स्यपालनामधील सामंजस्य कराराचे नूतनीकरण आणि लष्करी सहकार्याबाबत करार करण्यात आले.