खरंतर महिला एकत्र आल्या तर त्यांचं पटत नाही असं बोललं जात. पण समविचारांच्या समाजातील गरजू महिलांसाठी काहीतरी कार्यांच्या ‘ती’ ला स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला एकत्र आल्या तर निश्चितच बदल घडू शकतो याची प्रचिती आली. महिलांनी महिलांसाठी सुरु केलेलं व्यासपीठ वामा वूमेन्स क्लब चा उदघाटन सोहळा आज बाणेर येथील बंटारा भवन यथे मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्त्या पूनम विशाल विधाते यांनी या क्लब ची सूत्र हातात घेऊन महिलांच शिक्षण, मार्गदर्शन, सक्षमीकरण,व्यवसाय, आरोग्य यासाठी व्यासपीठ तयार केलं आहे. ७०० हुन अधिक महिलांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमास समाजसेविका ज्योती बालवडकर, मा. नगरसेविका सुषमाताई निम्हण, मा. नगरसेविका रोहिणी चिमटे, ज्येष्ठ प्राध्यापक सुनीता पाडाळे, समाजसेविका नीता जावळकर तसेच पत्रकार शितल बर्गे यांनी दीप प्रज्वलन करत ‘वामा वूमेन्स क्लबचे’ अनावरण केले.
“सुशिक्षित महिलांनी एकत्र येऊन समाजातील इतर महिलांसाठी मदतीचा हात दिला पाहिजे. त्यांच्यातील सुप्तगुणांना वाट मोकळी करून देत महिला सक्षमीकरण केले पाहिजे. या क्लब च्या माध्यमातून हे सुरु होत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे” असे मनोगत प्रमुख अतिथींनी व्यक्त केले.
मार्गदर्शन, संगीत, नाच अशा भरगच्च कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली. ”येणाऱ्या काळात महिलांसाठी विविध उपक्रम, मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जाणार असून यात महिलांचा सहभाग असायला हवा”. असे मत पुनमताई विधाते यांनी व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, कान, नाक, घसा तज्ञ व बाणेर, बालेवाडी डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. कविता चौधरी, बँक ऑफ बडोदा च्या वरिष्ठ व्यवस्थापिका वृषाली दरडे यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले.
जमलेल्या सर्व महिलांना वामा वुमन्स क्लब ची आठवण म्हणून कॉफी मगचे वाटप करण्यात आले.