मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवस ठाणे आणि मुंबईच्या भागात जारी केला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय विभागाने रायगड आणि रत्नागिरी परिसरात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दोन्ही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (64.65 ते 115..55 मिमी) अपेक्षित आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या उर्वरीत भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील विजांच्या कडकाडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय, प्रादेशिक अंदाज विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा परिसरात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
नाशिक, जळगाव, अमरावती, भंडारा आदी भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.