बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी लग्न करून नोंदणी पद्धतीने आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला. सोनाक्षी आणि झहीरचा विवाह सोहळा दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाआधीच्या विधींना शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मेहंदी सोहळा पार पडला. यानंतर शनिवारी सोनाक्षीच्या घरी म्हणजेच मुंबईतील ‘रामायण’ बंगल्यात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आणि काल दोघांनीही नोंदणी पद्धतीने लग्न केले. लग्नात, सोनाक्षीने एक सुंदर ऑफ-व्हाइट साडी परिधान केली होती त्याला मॅच करणारे दागिने तिने घातले होते.झहीरने सोनाक्षीच्या साडीच्या रंगाशी जुळणारी पांढरी शेरवानी घातली होती.
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लिहिले की, “सात वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते प्रेम जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.” आज त्या प्रेमाने आपल्याला सर्व आव्हाने आणि यशात मार्गदर्शन केले आहे. आणि म्हणून आम्ही या क्षणापर्यंत पोचलो आहोत. . आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि दोन्ही देवांच्या आशीर्वादाने, आम्ही आता पती-पत्नी आहोत…सोनाक्षी आणि झहीर…23.06.2024″
दरम्यान, सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लिम असल्याने दोघांचे लग्न कसे होणार? लग्नानंतर सोनाक्षी इस्लाम धर्म स्वीकारणार अशा अनेक चर्चा होत्या मात्र सोनाक्षीचे सासरे इक्बाल रत्नासी यांनी मीडियाला सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले आहेत की,”ती धर्मांतर करणार नाही.” येथे धर्म हा मुद्दा नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लिम धर्मात अल्लाह म्हणतात पण शेवटी आपण सर्व मानव आहोत. माझे आशीर्वाद नेहमीच झहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहेत.”