तामिळनाडूमध्ये कलाकुरीची येथे विषारी दारू प्यायल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ५३ ते ५५ पर्यंत वर पोहोचली होती. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तामिळनाडूतील कल्लाकुरिची हूच दुर्घटनेच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून म्हटले आहे की, या घटनेवर काँग्रेस पक्षाने पाळलेल्या मौन यामुळे मी “स्तब्ध” झालो आहे. मी हे पत्र केवळ भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणून लिहीत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संसद परिसरात प्रेरणा स्थळाच्या आत महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर या “राज्य प्रायोजित आपत्ती” विरोधात काळ्या पट्टीने निषेध करण्यासाठी त्यांच्या नेत्यांना सामील होण्याचे निमंत्रण दिले.
नड्डा आपल्या पत्रात म्हणाले, ”मला आशा आहे तुमची तब्येत चांगली असेल. मी खूप जड अंतकरणाने हे पत्र लिहीत आहे. मी हे पत्र केवळ भाजपचा सदस्य म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणून लिहीत आहे. तामिळनाडूच्या कलाकुरीची येथे विषारी दारू पिऊन आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५९ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामुळे देशभरात त्या लोकांबद्दल चिंता निर्माण झाली आहे.”
“खर्गे जी, कल्लाकुरिचीमधील दुर्घटना ही संपूर्णपणे मानवनिर्मित आपत्ती आहे आणि कदाचित सत्ताधारी द्रमुक-इंडिया आघाडी आणि अवैध दारू माफिया यांच्यामध्ये सखोल संबंध नसता, तर आज 56 लोकांचे प्राण वाचले असते. मे 2023 मध्ये सुमारे 23 जणांचा जीव वाचला असता. त्यावेळी देखील, भाजपने सत्ताधारी DMK-INDI आघाडी सरकारला त्यांच्या कार्यकर्त्या आणि अवैध दारू माफिया यांच्यातील संगनमताबद्दल सावध केले होते.’’