सध्या पुणे शहर गुन्हेगारीच्या अनेक घटनांमुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. पोर्शे अपघातापासून ड्रग्ज हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एफसी रस्त्यावर देखील ड्रग्जविरुद्ध अशीच मोठी कारवाई केली आहे. दरम्यान आता या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पब व बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप काँग्रेसचे कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यावर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान मेधा कुलकर्णी यांनी धंगेकर यांना टोला लगावला आहे. धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते. त्याचे काय? त्या कागदाचे आधी काय झाले? ते सांग असा जाब मेधा कुलकर्णी यांनी धंगेकरांना विचारला आहे. आम्ही एकदा मुद्दा उपथित करतो, तेव्हा तो शेवटपर्यंत नेतो, मध्येच सोडत नाही असा टोला देखील त्यांनी धंगेकरांना लगावला आहे.
पुण्याची प्रतिमा डागाळू नये यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करणार आहोत. पुणे पोलीस ड्रग्ज प्रकरणात वेगाने आणि योग्य ती कारवाई करत आहेत. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या प्रकरणात योग्य तपास करून कारवाईचे आदेश दिले असल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. पोर्शे अपघात प्रकरणापासून आमदार रवींद्र धंगेकर हे ड्रग्ज प्रकरणात सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.