पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सध्या अगरवाल कुटुंब तुरुंगात आहे. तर अल्पवयीन आरोपी हा बालसुधारगृहात आहे. दरम्यान मुंबई हायकोर्टाने पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीला दिलासा दिला आहे. अल्पवयीन मुलाला जामीन झाल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे हे बेकायदेशीर असून, त्याला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आरोपीच्या आत्येने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे.
पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात असल्याने आरोपीचा ताबा हा त्याच्या आत्येकडे दिला जाणार आहे. दरम्यान यामुळे आता पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या अपघाताने सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारने एका तरूणी आणि तरूणीला धडक दिली होती, ज्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.