Saturday, May 18, 2024

Logo
Loading...
google-add

मागासवर्गीय आणि दलितांचे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतले जाणार नाही ,पंतप्रधानांची झारखंडमध्ये ग्वाही

Editor | 16:17 PM, Sat May 04, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड राज्याच्या पलामू जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या डाल्टनगंज येथील चिंकी विमानतळावर निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. तेव्हा म्हणाले की,काहीही झाले तरी ते संविधानाला धक्का पोहोचू देणार नाहीत. मागासवर्गीय आणि दलितांचे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतले जाणार नाही. तसेच जाहीर सभेत जमलेली गर्दी पाहून पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही लोकांनी झामुमो-काँग्रेसला दिवसाच तारे दाखवले. मताची ताकदही त्यांनी जनतेला सांगितली आहे.





तुमच्या एका मताने 500 वर्षांनंतर राम मंदिर बांधले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तुमच्या एका मताने जम्मू-काश्मीरमध्ये ३७० हटवण्यात आले. नक्षलवाद संपला. तसेच 2014 मध्ये भ्रष्ट काँग्रेस सरकार एका मताने संपुष्टात आले. तुमच्या एका मताची ताकद समजून घ्या आणि राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाला सदैव साथ द्या. 13 मे रोजी आधी मतदान आणि नंतर अल्पोपाहाराबाबत ते बोलले. कितीही गरमी असली तरी मतदानासाठी घराबाहेर पडा, असेही ते म्हणाले.







आधी पाकिस्तानने दहशत निर्माण केली होती, पण आजचा नवा भारत घरात घुसून मारतो, असे मोदीनी यावेळी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकने पाकिस्तान हादरला. यापूर्वी झारखंड आणि बिहारचे तरुण नेहमीच शहीद होत होते. काँग्रेस सरकार दहशतवादाच्या भीतीने जगभर रडत असे. आज पाकिस्तान जगभर रडत आहे. मात्र काँग्रेसचा राजपुत्र पंतप्रधान व्हावा, अशी प्रार्थना पाकिस्तान करत आहे, पण संपूर्ण भारताला मजबूत सरकार बनवायचे आहे आणि मोदी सरकार स्थापन करायचे आहे.





पीएम मोदी म्हणाले की, ज्याने आईला धुरात खोकताना पाहिले नाही, त्याला गरिबी कशी कळणार? ज्याने आईला पाणी पिऊन भूक शमवताना पाहिले नाही, त्याला गरिबी कशी कळणार? ज्यांनी शौचालयाअभावी वेदना आणि अपमान पाहिलेला नाही त्यांना मोदींच्या अश्रूंचा अर्थ कळणार नाही. काँग्रेसच्या राजपुत्रांचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांच्या घरात अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. ते चांदीच्या चमच्याने जन्माला येतात. दलित आदिवासींसोबत फोटो काढून त्यांची चेष्टा करतात. मोदींच्या अश्रूंमध्ये काँग्रेसवाल्यांना संधी मिळते. मोदींच्या डोळ्यात अश्रू चांगले दिसतात, असेही काँग्रेसवाले म्हणतात.




पलामूला इतके दिवस मागासलेला जिल्हा मानून येथे कोणताही चांगला अधिकारी यायचा नाही,पंतप्रधान सांगत होते. . काँग्रेस सरकार या जिल्ह्याकडे निकृष्ट दर्जाच्या नजरेने पाहत असे, पण त्यांनी पलामूला महत्त्वाकांक्षी जिल्हा बनवून विकासाच्या पातळीवर आणले. पहिल्या 100 पैकी 14 जणांकडे कायमस्वरूपी घरे होती. आज जवळपास प्रत्येकाकडे कायमस्वरूपी घरे आहेत. कोणाकडे काही कच्ची घरे शिल्लक असतील तर त्यांची नावे व पत्ते लिहून पाठवा. तिसऱ्या टर्ममध्ये कायमस्वरूपी घर बांधले जाईल. आपण ह्याची हमी देत असल्याचे मोदी म्हणाले आहेत.




काँग्रेसला दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही. आम्ही आरक्षण जाऊ देणार नाही. छेडछाड करून संविधान बदलू देणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मस्थानाला भेट देणारा मी पहिला पंतप्रधान आहे. सन 2025 मध्ये, बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती भारताच्या कानाकोपऱ्यात आदिवासी गौरव वर्ष म्हणून साजरी केली जाईल.




नरेंद्र मोदी म्हणाले की, झारखंडमध्ये भाजप AJSU सोबत पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणूक लढवत आहे. विष्णू दयाल हे पलामूमधून उमेदवार आहेत. 13 मे रोजी भाजपला मतदान करून विजयी करा आणि केंद्रात तिसऱ्यांदा मोदींचे सरकार स्थापन करा. व्हीडी राम इतके साधे आहेत की त्यांच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की ते डीजीपीही झाले आहेत.




पंतप्रधानच्या ह्या सभेला ठिकठिकाणी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात होते. यावेळी भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

google-add
google-add
google-add

पहा LIVE

latest update

जरूर वाचा

आंतरराष्ट्रीय

google-add

लोकसभा निवडणूक

google-add

राजकारण

google-add
google-add
google-add

युवा

google-add
google-add