जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला आहे. झारखंड हायकोर्टाने झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला आहे. हेमंत सोरेन, निलंबित महसूल कर्मचारी भानू प्रताप प्रसाद, जेएमएम नेते अंतू तिर्की, अफसर अली, विपिन सिंग, प्रियरंजन सहाय आणि इरसद अख्तर यांना कथित जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता त्याचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. हेमंत सोरेन दुपारी चार वाजता तुरुंगातून बाहेर आले. हेमंत सोरेन 5 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत.
हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांची दाढी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. सोरेन तुरुंगाबाहेर आले तेव्हा त्यांचे समर्थक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री असताना ईडीने त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणाची सुनावणी १३ जून रोजी न्यायालयाने पूर्ण केली आहे. त्यानंतर आज न्यायालायने निर्णय जाहीर करत हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यामुळे हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ८ ते ९ एकर जमिनीवर ताबा मिळवल्यामुळे ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत अटकेची कारवाई केली होती.
दरम्यान हेमंत सोरेन हे प्रभावशाली व्यक्ती असू, त्यांना जामीन मिळाल्यास ते चौकशीवर प्रभाव पाडू शकतात असे म्हणत ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता. सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत एका कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीनंतर सोरेन यांनी झारखंडच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ईडीने दावा केला आहे की, त्यांनी जेएमएम प्रमुखाच्या ताब्यातून 36 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जप्त केले आहे, तसेच “फसवणूक मार्गाने” जमीन संपादन केल्याच्या चौकशीशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त केली होती.