आसाममध्ये मुस्लिमांची संख्या लोकसंख्येच्या 40 टक्क्यांवर पोहचली असून हा मोठा मुद्दा असल्याचे विधान राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काल केले आहे. झारखंडच्या रांची येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. ही लोकसंख्या 1951 मध्ये 12 टक्के होती. या कालावधीत आपण अनेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे. कोणताही गुन्हा कुण्या एखाद्या विशिष्ट धर्माकडून गेला जातो असे मी म्हणत नाही. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घटना चिंतेचा विषय आहे. यापूर्वी 23 जून रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी दावा केला होता की, बांगलादेशी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले होते.
केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मतदान केले होते. बांगलादेशी वंशाचे अल्पसंख्याक हा एकमेव समुदाय असा आहे, जो राज्यात जातीयवादात गुंतला आहे, असा दावाही सरमा यांनी केला होता.आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत 24 पैकी 15 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर 3 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत.