कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला पाह्यला मिळतोय. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला देखील बस्तान दिसत आहे. राज्यातील बहुतांश नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस होत आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे.
मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. तसेच ८० पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पंचगंगा नदीची पातळी ४३ फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर आहे. त्यामुळे कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे कोयनेतून देखील पाण्याचा विसर्ग सुरु केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
पुणे शहरात कातपासून पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान मुसळधार पावसामुळे शाळां सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सिंहगड रास्ता परिसरात पाणी भरल्याने तेथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. छातीच्या लेव्हलपर्यंत पाणी आल्याने नागरिकांच्या रेस्क्यूसाठी बोटींचा वापर करण्यात आला आहे.