Heavy Rains : गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात सलग पाऊस सुरु आहे. यामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रामध्ये सकाळी सुरू असणारा 29414 क्युसेक्स विसर्ग वाढऊन सकाळी 11:00 वाजता 35002 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतो. असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
https://x.com/PMCPune/status/1819952090149429605
पुणे, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक धरणे भरली आहेत. खडकवासला धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले असून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. अशास्थितीत आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन सातत्याने केले जात आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून पाणी सोडत असताना पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराला तैनात राहण्याची विनंती केली आहे. यासाठी पुण्यातील एकता नगर परिसरात भारतीय लष्कर तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.