कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat ) हीने नुकताच कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विनेश फोगटच्या कॉँग्रेस पक्ष प्रवेशावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगट यांनी जोरदार आरोप केलेले आहेत. फोगट कुटुंबात “तेढा” निर्माण केल्याचा आरोप भूपेंद्र सिंह हुड्डा (Bhupendra Singh Hudda) यांच्यावर बबिता फोगट (Babita Phogat ) यांनी केला आहे. तसेच विनेशने कॉँग्रेस पक्षात सामील होण्याचा घाईघाईने निर्णय घेतला आहे असे देखील यावेळी बोलताना ती म्हणाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि यानंतर त्यांना जुलाना मतदारसंघातून हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
विनेश फोगट यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावरून बबिता फोगट यांनी अनेक विधान केलेली आहेत. फूट पाडा आणि राज्य करा हा काँग्रेसचा अजेंडा आहे. त्यांनी नेहमीच कुटुंबे तोडण्याचे काम केले असून फोगट कुटुंबात तेढ निर्माण करण्यात हुड्डा यशस्वी झाले आहेत. लोक धडा शिकवतील असे वक्तव्य बबिता फोगट यांनी केले आहे.
बबिता फोगट यांनी 2019 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्या वर्षी विधानसभा निवडणुकीत त्या अयशस्वी झाल्या होत्या. यावर्षी बबिता फोगट यांना पक्षाने तिकीट दिले नाही. यावरूनच बबिता फोगट म्हणाल्या आहेत की, ‘व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा’ अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विनेशचे काका महावीर फोगट यांनी विनेश फोगटच्या कॉँग्रेस पक्ष प्रवेशाच्या निर्णयावर भाष्य केले होते. विनेशने 2028 च्या ऑलिम्पिकसाठी स्वतःला तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजेत. तिने आपल्या कुस्ती कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले असते तर पुढील ऑलिम्पिकमध्ये ती सुवर्णपदक जिंकू शकली असती असे म्हणाले आहेत. . त्यावरच बोलताना बबिता फोगट म्हणाली.आहे की, “महावीर फोगट हे विनेशचे गुरू आहेत. तिने आपल्या गुरूची आज्ञा पाळायला हवी होती. गुरूच योग्य मार्ग दाखवत असतात.