बंगळुरुमधील (Bengaluru) सेल्सवुमन महालक्ष्मीच्या हत्येचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 59 तुकडे करून तिची हत्या केली गेली होती. या हत्येत महालक्ष्मीच्या नवऱ्याचा हात आहे असा संशय पोलिसांना होता परंतु तिचा नवरा हेमंत याची चौकशी केल्यांनतर हा संशय दूर झाला होता. तिच्या नवऱ्याने दिलेल्या जबाबात महालक्ष्मीचे अशरफ नावाच्या हेयर ड्रेसरसोबत प्रेमप्रकरण सुरु होते हि माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी अशरफची देखील चौकशी केली. मागील 20 दिवसातील अशरफचे लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले आहेत तसेच त्याचा प्रत्यक्ष जबाब घेतल्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय दूर झाला. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून महालक्ष्मीची हत्या करणाऱ्या नराधमाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
महालक्ष्मी वायलिकावल भागात घर घेऊन राहत होती. तिला एक मुलगी देखील होती. ती एका मॉलच्या ब्युटी सेंटरमध्ये काम करत होती. ती आणि तिचा नवरा हेमंतमध्ये दुरावा वाढला होता त्यामुळे ते दोघे वेगळे राहत होते असे महालक्ष्मीच्या आईने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी महालक्ष्मीचा फोन बंद लागू लागला तिची काळजी वाटू लागली यामुळे तिची आई तिला भेटायला गेली होती. तिच्या आईने घराचा दरवाजा उघडल्यानंतर अतिशय दुर्गंधी येऊ लागली होती. यावेळी जमिनीवर महालक्ष्मीच शिर पडलेले होते आणि फ्रिजमध्ये मृतदेहाच 30 ते 40 तुकडे करून ठेवण्यात आले होते. हा सर्व प्रकार पाहून तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे.
आता महालक्ष्मीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले आहे. मुक्ती रंजन रॉय याने महालक्ष्मीची हत्या केली आहे. तो फंडी गावचा असून बंगळुरुमध्ये एका कपड्याच्या दुकानात नोकरी करायचा. 25 सप्टेंबरला भद्रक शहरात मुक्ती रंजन रॉयचा मृतदेह सापडला आहे. त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्याच्या जवळ एक डायरी आणि डेथ नोट सापडली आहे. या डेथ नोटमध्ये मीच महालक्ष्मीचा खून केला असल्याचे त्याने सांगितलेले आहे.
मी ३ सप्टेंबरला महालक्ष्मीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी आमच्यात भांडण झाले आणि भांडणात तिने माझ्यावर हल्ला केला. हे मला अजिबात आवडले नाही आणि यांनतर रागाच्या भरात मी तिची हत्त्या केली आणि मृतदेहाचे 59 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. यांनतर त्या ठिकाणाहून पळून आलो. महालक्ष्मीचे वर्तन मला अजिबात आवडत नव्हते परंतु तिच्या हत्येचा मला पश्चाताप आहे असे मुक्ती रंजन रॉय याने डेथ नोटमध्ये लिहिलेले आहे.