Israeli PM Netanyahu : गेल्या वर्षभरापासून इस्रायल व पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमध्ये युद्ध चालू आहे. दरम्यान, या युद्धात लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिज्बुल्लाहने देखील उडी घेतली. अशा स्थितीत इस्रायली सैन्य एकाच वेळी दोन दहशदवादी संघटनांसोबत एकटाच लढत आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रविवारी 29 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या म्हणजेच यूएनजीएच्या ७९ व्या सत्राला संबोधित केले. यावेळी नेतान्याहू यांनी मध्य-पूर्वेत चालू असलेल्या संघर्षासाठी इराणला जबाबदार ठरवले. तसेच यावेळी त्यांनी दोन नकाशे दाखवले. हे नकाशे दाखवत नेतान्याहू यांनी एका नकाशाला शाप आणि दुसऱ्या नकाशाला आशीर्वाद असे म्हंटले आहे.
नेतन्याहू यांच्या उजव्या बाजूच्या नकाशावर इराण, इराक, सीरिया आणि येमेन दिसत आहेत. या देशांना नेतान्याहू यांनी “शाप” म्हटले आहे. नेतान्याहू यांच्या डाव्या हातातील नकाशावर इजिप्त, सुदान, सौदी अरेबिया आणि भारत हे देश दिसत आहे. या देशांना ‘आशीर्वाद’ म्हंटले आहे.
उल्लेखनीय आहे की 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते. तथापि, भारताने संपूर्ण युद्धविरामाचे आवाहन केले आहे.
यावेळी नेतान्याहू यांनी हे नकाशे हातात धरून जगाने “आशीर्वाद” आणि “शाप” यापैकी एक निवडणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे. आपल्या भाषणात नेतन्याहू यांनी इराणवर निशाणा साधत आमच्यावर हल्ला केला तर आम्ही देखील तुमच्यावर हल्ला करू. “इराणमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायलचे हात पोहोचू शकत नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिली.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात जोरदार युद्ध सुरु
सध्या इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात जोरदार हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात हिजबुल्लाह नेता हसन नसरुल्ला याचा शनिवारी मृत्यू झाला. तुमच्या माहितीसाठी गेल्या काही दिवसांपासून इस्रायल लेबनॉनवर हल्ला करत आहे. प्रत्युत्तरात हिजबुल्लाह देखील इस्रायलवर हल्ला करत आहे. दरम्यान, या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता हसन नसरुल्ला याचा मृत्यू झाला.