Jammu Kashmir Elections Results : सध्या जम्मू-कश्मीर मधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. आज सकाळापासूनच येथे विधानसभा (Haryana and J&K Election Results 2024) निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. जम्मू-काश्मीर मध्ये तब्बत दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत असून, येथे कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस ही निवडणूक आघाडीने लढवत आहेत, तर भाजप एकटाच लढत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सकाळपासूनच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतल्याची दिसत आहे. पण जरी जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता आली तरी देखील राज्यातील सत्तेवर भाजपचाच वरचष्मा असेल असे बोलले जात आहे. हे कसे? जाणून घेऊया…
जम्मू-काश्मीरमध्ये उपराज्यपालांना अनेक अधिकार आहेत. या उपराज्यपालांच्या माध्यमातूनच भाजप सत्तेवर नियंत्रण ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. पाच सदस्यांना कोणतीही निवडणूक न लढवता थेट विधानसभेत पाठवण्याचा अधिकार उपराज्यपालांना आहे. ज्या सदस्यांना विधानसभेत पाठवलं जाईल, त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे सुद्धा उपराज्यपालच ठरवणार आहेत. उपराज्यपालांना मिळालेल्या या शक्तीवर सध्या सवाल केले जात आहेत. उपराज्यपालांची नियुक्ती ही केंद्र सरकार करते. बऱ्याचवेळा पक्षाच्या नेत्यालाच उपराज्यपाल म्हणून पाठवले जाते. अशावेळी ती व्यक्ती त्या राज्यात पार्टीचा अजेंडा राबवण्याची शक्यता अधिक असते. जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचीही सत्ता आली तरी सत्तेची सर्व सूत्र उपराज्यपालांच्या हाती असणार आहेत. अशा परिस्थितीत भाजप पडद्याआडून सत्तेवर असणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सोमवारी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘जरी भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये बहुमत मिळाले नाही तरी देखील ते उपराज्यपालांच्या माध्यमातून आपल्याकडे जास्त हक्क ठेवतील.
The man goes to Delhi for 24 hours and comes back to play straight in to the hands of the BJP. The BJP would like nothing more than to extend central rule in J&K if they aren’t in a position to form a government. https://t.co/d2AK2r6Mjm
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 7, 2024
अब्दुल्ला यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल पोस्ट करत लिहिले की, “उपराज्यपाल 24 तास दिल्लीला जात-येत असतात, जर भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू शकत नसेल, तरी देखील ते जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राजवट वाढवू शकतात आणि त्यांना हे करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.’