Narendra Modi : स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ (Pedro Sanchez) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी ते गुजरातमधील वडोदरा शहरात पोहोचले आहेत. पंतप्रधान पेद्रो सांचेझ हे पहिल्यांदाच अधिकृतपणे भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान सांचेझ हे मंगळवारी मुंबईला देखील भेट देणार आहेत.
स्पेनचे पंतप्रधान सांचेझ आणि पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी वडोदरा येथील टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) येथे C-295 विमानांच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले आहे. उद्घाटनापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रोड शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.
वडोदरा येथे पंतप्रधान मोदींनी स्पेनच्या पंतप्रधानांसोबत रोड शो केला आहे. त्यांचा रोड शो वडोदरा विमानतळ ते टाटा प्लांट असा सुमारे साडेतीन किलोमीटरचा होता. त्यांच्या या रोड शोबाबत वडोदरातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मोदींच्या रोड दरम्यान मोठ्या संख्येने लोक जमले होते. सकाळपासूनच त्यांच्या रोड शोच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात लोक पोस्टर्स आणि बॅनर घेऊन उभे होते.
#WATCH | Vadodara, Gujarat: Prime Minister Narendra Modi, President of the Government of Spain, Pedro Sanchez hold a roadshow in Vadodara
The two leaders will inaugurate the Final Assembly Line Plant of C295 aircraft at Vadodara today
(Source: ANI/DD News) pic.twitter.com/bLO4N4o0G0
— ANI (@ANI) October 28, 2024
2022 मध्ये केली होती पायाभरणी
2022 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी C 295 विमान निर्मिती सुविधा संकुलाच्या बांधकामाची पायाभरणी केली होती. वडोदरा येथील टाटाच्या या विमान संकुलात एकूण 40 सी-295 विमानांची निर्मिती केली जाणार आहे. देशातील खाजगी क्षेत्रातील विमान निर्मितीची ही पहिलीच सुविधा आहे. C-295 विमानांच्या निर्मितीअंतर्गत एकूण 56 विमाने बनवण्याची योजना आहे.
4800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
56 विमानांपैकी 16 थेट स्पेनमधून एअरबसद्वारे वितरित केले जाणार आहेत. तर उर्वरित 40 भारतात उत्पादित केले जाणार आहेत. टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी आज 4800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये रेल्वे, महामार्ग आणि नद्यांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.
C-295 विमाने तयार करण्यासाठी वडोदरा येथील टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स ही भारतातील लष्करी विमानांसाठी खाजगी क्षेत्रातील पहिली शेवटची असेंब्ली लाइन आहे. विमान संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर, पंतप्रधान मोदी आणि सांचेझ पूर्वीच्या बडोदा राजघराण्याचे निवासस्थान असलेल्या ऐतिहासिक लक्ष्मी विलास पॅलेसला भेट देतील, जिथे ते पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत
लक्ष्मी विलास पॅलेसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी अमरेली येथे जाणार आहेत. जेथे पीएम मोदी दुपारी 2:45 वाजता दुधाळा येथे भारत माता सरोवरचे उद्घाटन करणार आहेत.