Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Elections) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील महायुती तसेच महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 7,995 उमेदवारांनी 10,905 उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. महाराष्ट्रातील एका टप्प्यातील निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
Maharashtra Election Commission released a press note informing that 10905 nomination papers of 7995 candidates have been filed till 29 October 2024 for the elections in 288 constituencies of the Maharashtra Legislative Assembly. pic.twitter.com/vZH1qNQbyg
— ANI (@ANI) October 29, 2024
अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात
उमेदवारी दाखल करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये मालेगाव बाह्य विधानसभेतून कॅबिनेट मंत्री दादा भुसे (शिवसेना), येवला विधानसभेतून छगन भुजबळ (राष्ट्रवादी), नांदगावमधून सुहास द्वारकानाथ कांदे (शिवसेना), नाशिक पूर्वमधून राहुल उत्तमराव ढिकले (भाजप) आणि वसंत गिते यांचा समावेश आहे (UBT. त्यांनी नाशिक मध्य येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे (शिवसेना) यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
2019 मध्ये 3239 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 5543 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते आणि अर्जाची छाननी केल्यानंतर 3239 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
‘या’ तारखेला होणार मतदान
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.