Narendra Modi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल (शुक्रवारी) पंतप्रधान मोदींनी दोन सभांना संबोधित केले आहे. त्यांची पहिली सभा धुळ्यात पार पडली तर दुसरी सभा नाशिक येथे पार पडली आहे.
प्रचारासाठी अवघे नऊ दिवसच शिल्लक असताना, सर्वच पक्षांनी कंबर कसली असून विविध भागात प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात मोदींच्या प्रचार सभांचा धुराळा सुरु आहे. आजही पंतप्रधानांच्या दोन सभा पार पडणार आहेत. आज दुपारी १२ वाजता पंतप्रधान अकोल्यात एक प्रचार सभा घेतील, आणि दुपारी दोन वाजता दुसरी सभा नांदेड येथे घेतील. राज्यात पंतप्रधानच्या एकूण ९ सभा पार परडणार असून, त्यांची शेवटची सभा 14 तारखेला आहे.
दरम्यान, काल धुळ्यातील सभेत पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधील हटवण्यात आलेल्या कलम 370 वर मोठे भाष्य केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यावरच भाष्य करत पंतप्रधान मोदींनी कोणीही कलम 370 पुन्हा लागू करू शकत नाही असा इशारा दिला आहे.
सध्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम 370 पुन्हा लागू करण्यावरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी ‘जोपर्यंत मोदीवर जनतेचा आशीर्वाद तोपर्यंत काश्मीरमधून बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हटवू शकत नाही. जगातील कुठलीही शक्ती जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकत नाही,” असा इशारा धुळ्यातील सभेतून दिला आहे.