संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज चालू आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज मतदान पार पडत असून, या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर विरोधी महाआघाडी आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे.
दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यभरातील मतदानाची आकडेवारी समोर आली असून, नक्षलग्रस्त तसेच आदिवासी जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेलाही मतदानाच्या बाबतीत गडचिरोलीच बाजी मारली होती. या मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. गडचिरोलीमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 50.79 टक्के मतदान झाले आहे.
तर ठाकरे बंधूंची स्पर्धा असणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या मुंबईमध्ये मात्र सर्वात कमी मतदान झाल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई शहरात ३९.३४ टक्के इतकं मतदान झालं आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातील मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे
अहमदनगर – 47.85
अकोला – 44.45
अमरावती – 45.13
औरंगाबाद – 47.05
बीड – 46.15
भंडारा – 51.32
बुलढाणा – 47.48
चंद्रपूर – 49.87
धुळे – 47.62
गडचिरोली – 62.99
गोंदिया – 53.88
हिंगोली – 35.97
जळगाव – 40.62
जालना – 50.14
कोल्हापूर – 54.06
लातूर – 48.34
मुंबई शहर – 39.34
मुंबई उपनगर – 40.89
नागपूर – 44.45
नांदेड – 42.87
नंदूरबार – 51.16
नाशिक – 46.86
उस्मानाबाद – 45.81
पालघर – 46.82
परभणी – 48.84
पुणे – 41.70
रायगड – 48.13
रत्नागिरी – 50.04
सांगली – 48.39
सातारा – 49.82
सिंधुदुर्ग – 51.05
सोलापूर – 43.49
ठाणे – 38.94
वर्धा – 49.68
वाशिम – 43.67
यवतमाळ – 48.81