Salman Khan: सलमान खान व रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असणारा सिकंदर(Sikandar) चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. ए. आर. मुरुगादॉस यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ घालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता हा चित्रपट फ्लाॅप ठरत असल्याचे दिसत आहे.
२०० कोटींचे बजेट असलेल्या सिकंदर चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत किचिंत वाढ झाल्याचे दिसले. मात्र चौथ्या दिवशी कमाईत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. सिकंदरने चौथ्या दिवशी ९.७५ कोटींचा गल्ला जमवला. तेव्हापासून या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होताना दिसत आहे. त्यामुळे बाॅक्स ऑफिसवर सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची जादू फिकी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सिकंदरच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खानने चित्रपटाच्या कमाईबाबत भविष्यवाणी केली होती. सलमान खान म्हणाला होता की, “चित्रपट चांगला असो वा वाईट, चाहते १०० कोटी पार करून टाकतात. परंतु १०० कोटी ही खूप आधीची गोष्ट आहे, आता २०० कोटींचा व्यवसाय करून देतात,” मात्र सलमानचा हा अंदाज यावेळी फेल ठरल्याचे दिसते. सिकंदर चित्रपटात सलमान, रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर यांची भूमिका महत्वाची आहे. तसेच बाहुबली चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.
दरम्यान, सिकंदर चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ११ मे किंवा २५ मेपासून ओटीटीवर प्रदर्शित होईल, अशा चर्चा आहेत. मात्र अद्याप अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.