गेल्या आठवड्यात सिंगापूरमधील एका शाळेत आग लागली होती. या आगीत दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धाकटा मुलगा मार्क जखमी झाला होता. या घटनेत एका 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तसेच या आगीत 19 जण जखमी झाले होते.
मार्क सिंगापूरच्या रिव्हर व्हॅली भागातल्या शाळेत शिकतो. शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्या फोडून मुलांना आणि शिक्षकांना वाचवले.त्यावेळी मार्क जखमी झाला असला तरी आता तो धोक्याबाहेर आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी पवन कल्याण यांच्या पत्नी अण्णा लेझनेवा यांनी देवाला नवस केला होता की जर मुलगा सुखरूप राहिला, तर त्या आपले केस तिरुपतीच्या देवाला अर्पण करतील.
अलीकडेच अण्णा लेझनेवा यांनी तिरुमला येथे जाऊन श्री वेंकटेश्वर स्वामीचे दर्शन घेतले आणि आपले मुंडण देखील केले. त्यांच्या मुंडनाचे फोटो आणि व्हिडिओ पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
తిరుమల శ్రీ వేంకటేశ్వర స్వామి వారికి మొక్కులు చెల్లించుకున్న శ్రీమతి అన్నా కొణిదల గారు.
శ్రీ వరాహ స్వామివారి దర్శనం చేసుకుని అనంతరం పద్మావతి కళ్యాణ కట్టలో భక్తులందరితోపాటు తలనీలాలు సమర్పించిన శ్రీమతి అన్నా కొణిదల గారు. pic.twitter.com/ELBA9IN1EC
— JanaSena Party (@JanaSenaParty) April 13, 2025
तिरुपतीमध्ये मुंडण करण्याची परंपरा आहे. भक्त देवाकडून एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर आपले केस अर्पण करतात. अण्णा लेझनेवा यांनीही हाच नवस पूर्ण केला आणि आपल्या मुलाच्या जीवाला वाचवल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले.