नेहरू आणि गांधी परिवारचा भारताविरोधी कारवायांमध्ये छुपा हस्तक्षेप आहे. असा आरोप त्यांच्यावर गेल्या कित्येक काळापासून होत आहे. आणि जर आपणही छोटे-छोटे धागे जोडत गेलो तर आपल्याला देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळत. भारताला उध्वस्त करण्यासाठी बाहेरील अनेक शक्ती सातत्याने प्रयत्न करत असतात. याच शक्तींसोबत नेहरू-गांधी परिवाराची हातमिळवणी असल्याचे पुरावे अनेकदा समोरही आले आहेत. यात नेहरू -गांधी परिवाराचे भारताबद्दल वादग्रस वक्तव्य विधान करणे असो किंवा मग भारतविरोधी वाईट विचार करणाऱ्या शक्तींसोबत त्यांची जवळीक असो. या सिरीजमध्ये आपण नेहरू व गांधी परिवाराचा भारताविरोधात कारवायांमध्ये कसा छुपा हस्तक्षेप आहे? हे जाणून घेणार आहोत.
प्रथम आपण राहुल गांधींविषयी बोलूयात…काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नेहमीच परदेशात जाऊन भारताविरुद्ध वक्तव्य करताना दिसतात. त्यांच्या याच भूमिकेवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राहुल गांधी जेव्हा-जेव्हा परदेशात दौरा करतात तेव्हा-तेव्हा ते भारताबद्दल काही न काही विधान करत देशात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता नुकतेच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असेच काही वक्तव्य केले आहे. राहुल गांधी सध्या दोन दिवशीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत एक वक्तव्य केले आहे.
अमेरिका दौऱ्यावर त्यांनी बोस्टन शहरातील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका सत्रामध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी निवडणुकीत निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Boston, US: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says "It is very clear to us that the Election Commission is compromised, and it is very clear that there is something wrong with the system. I have said this multiple times…More people voted in the Maharashtra Assembly… pic.twitter.com/tUa7i2S2XN
— ANI (@ANI) April 21, 2025
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे घडणं केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटं लागतात. जर ही वेळ लक्षात घेतली तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असे कुठेही घडल्याचे पाहण्यास मिळालं नाही.
“आम्ही निवडणूक आयोगाला विचारले होते की मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली जाणार आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी कायद्यातही बदल केला त्यामुळे तुम्हाला वाटले, कुणालाही वाटले तरीही ते मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत हे अगदी स्पष्ट झाले आहे” असे वक्तव्य त्यांनी अमेरिकेत केले.
बरं राहुल गांधींचे हे एकच वक्तव्य नाही तर त्यांनी याआधी देखील अशीच काहीशी वक्तव्य परदेशात केली आहेत, ज्यामुळे देशात गोंधळ उडाला आहे. राहुल गांधी यांचा सप्टेंबर २०२४ मधील अमेरिका दौरा देखील खूप गाजला होता. या दौऱ्यात त्यांनी लोकसभा निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी आरक्षण, देशातील रोजगार आणि शीख समाजावर वक्तव्य केले होते.
अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठात त्यांनी ही वक्तव्य केली. देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी म्हणाले होते की, ‘जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही.’
पुढे त्यांनी भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर, विशेषतः शीख समुदायाला संबोधित करून, राजकीय वाद निर्माण केला होता. शीख म्हणून त्याला भारतात पगडी घालण्याची परवानगी मिळेल की नाही, किंवा त्याला कढई घालण्याची परवानगी मिळेल की नाही किंवा गुरुद्वारात जाण्याची परवानगी मिळेल की नाही.’ असं वक्तव्य करत त्यांनी भारताची बदनामी करण्याचा आणि अमेरिकेतील मोदी सरकारची नकारात्मक प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला होता.
I unequivocally condemn Rahul Gandhi’s derogatory and divisive remarks on foreign soil about Sikhs’ Dastar and Kakaar in India. In India, no Sikh has ever been stopped from wearing a turban or visiting a Gurudwara!
Prime Minister Modi Ji, in his deep respect for Sikhism, proudly… pic.twitter.com/gXfX8AiEIN
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) September 10, 2024
Sikhs protest outside Rahul Gandhi's house over his statement regarding Sikhs.
Rahul Gandhi murdabad slogans were raised! 👏🏻👏🏻 pic.twitter.com/hx0ILP89YK
— Mr Sinha (@MrSinha_) September 11, 2024
दुसरीकडे भारतातील रोजगावर देखील त्यांनी वक्तव्य केले होते. ‘भारतातील बहुतेक वस्तू ‘मेड इन चायना’ आहेत. म्हणूनच चीन यशस्वी आहे. भारताला उत्पादनाचे महत्त्व अजूनही समजले नाही. त्यामुळे भारतात बेरोजगारी वाढली आहे.’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.
आता त्यांच्या या परदेशात दौऱ्यातील वक्तव्यांमध्ये भारतबद्दल कोणतेही सकारात्मक विधान दिसत नाही. जेव्हा-जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा-तेव्हा ते देशातील संवेदनशील मुद्द्यांवर बोलून एक “नॅरेटिव” सेट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे राहुल गांधींची अशी बेजबाबदार वक्तव्य देशातील सरकार विरोधी आहेत? की भारता विरोधी? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
खरं तर राहुल गांधी यांनी भारतातील संवेदनशील मुद्दे परदेशात न मांडता या मुद्द्यांवर देशातच चर्च करून असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा सल्ला त्यांना विरोधी पक्षांकडून देण्यात येतो.
दरम्यान, नुकतेच क्रेंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राहुल गांधी यांना जेव्हा देशाच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी सभागृहात वेळ दिला जातो तेव्हा ते परदेश दौऱ्यावर असतात. असा आरोप केला होता.