तामिळनाडूतील हिंदूविरोधी स्टॅलिन सरकारने 21 प्रसिद्ध हिंदू मंदिरांमध्ये अर्पण केलेले 1000 किलोपेक्षा जास्त सोने वितळवून त्याचे 24 कॅरेटचे सोन्याचे बार तयार केले आहेत. हे सोने मुंबईतील सरकारी टांकसाळीत वितळवण्यात आले आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये “सुवर्ण गुंतवणूक योजनेअंतर्गत” जमा करण्यात आले.
31 मार्चपर्यंत राज्यातील 21 मंदिरांमधून मिळालेल्या 10,74,123.488 ग्रॅम शुद्ध सोन्यावर सरकारला दरवर्षी 17.81 कोटी रुपये व्याज मिळते, जे गुंतवणुकीच्या वेळी सोन्याच्या किमतीनुसार निश्चित केले गेले. मंदिरांमध्ये, तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील समयापुरम येथील अरुलमिघू मरीअम्मन मंदिराने गुंतवणूक योजनेसाठी सर्वाधिक 424 किलो सोने दान केले.
या सोन्यातून मिळनाऱ्या व्याजाचा पैसा संबंधित मंदिरांच्या देखभाली आणि विकासासाठी वापरण्यात येतो,असा दावा संबंधीत अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र कायम हिंदू विरोधी भूमिका घेणारे स्टॅलिन हा पैसा हिंदू मंदिराच्याच विकासासाठी वापरतील हे याबाबात शंका उपस्थित केली जात आहे. कारण यामागे सरकारला निधीची आवशकता असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते या सोन्याच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी उभा करू शकतात.
दरम्यान राज्यातील धर्मादाय आणि मंदिर प्रशासन विभागाचे मंत्री पी.के. शेखर बाबू यांनी सुवर्ण गुंतवणूक योजनेची माहिती विधानसभेत दिली आहे. तसेच या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्याही नेमण्यात आल्या आहेत.
मात्र विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्या स्टॅलिन सरकारने हिंदू धर्मावर वादग्रस्त विधाने करून रोष ओढवून घेतला, त्याच सरकारला आता राज्याच्या तिजोरीला श्वास देण्यासाठी हिंदू मंदिरांच्या सोन्याची मदत घ्यावी लागली आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना कोणताही नेता सर्व धर्मांना समान वागणूक देण्याचे वचन देतो. पण एम.के.स्टॅलिन संविधानिक पदावर असतानाही त्यांनी हिंदुंवर तोंडसुख घ्यायचे सोडले नाही.त्यामुळे आजही हिंदू समाजात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. आता सरकारला निधीची आवश्यकता भासली, तेव्हा मंदिरातील दान केलेलं सोने त्यांना उपयोगी पडले आहे. त्यामुळे स्टॅलिन आता तरी हिंदू धर्माबद्दल द्वेषपूर्ण बोलणे थांबवतील का? ते पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.