मणिपूर राज्य गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक, जातीय आणि राजकीय अशांततेत सापडलेले आहे. राज्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या फुटीरतावादी संघटनांनी स्वतंत्रतेच्या मागणीसाठी शस्त्रसज्ज लढा सुरू ठेवला आहे.त्यातच आता मणिपूरमधील सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत १० दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी वेगवेगळ्या बंदी घातलेल्या संघटनांचे सदस्य होते. ही अटक इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. शनिवारी (२६ एप्रिल) इम्फाळ पूर्वेतील वांगखेई थंगापत भागातून युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट या संघटनेचे चार कार्यकर्ते आणि त्यांचा एक सहकारी अटकेत आला आहे. हे लोक स्थानिकांकडून खंडणी वसूल करत होते आणि स्थानिकांना धमकावत होते.
याच दिवशी इम्फाळ पश्चिममधून पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी ऑफ कांगलेईपाक चा एक सदस्य पकडला गेला आहे. तसेच कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (PWD) या संघटनेचे पाच कार्यकर्तेही अटक करण्यात आले.या लोकांनी इंफाळ खोऱ्यात अनेक बेकायदेशीर कामे केली होती जसे की जबरदस्तीने पैसे मागणे लोकांना त्रास देणे. इत्यादी तसेच काकचिंग जिल्ह्यातील मोल्टीनचाम गावात देखील पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि त्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यात रायफल, बंदुका, ग्रेनेड, काडतुसे, बॉम्बशेल आणि इतर संरक्षणसामग्रीचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिसांसाठी मोठे यश मानली जात आहे. या अटकेमुळे मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचे हालचाली कमी होतील, तसेच ही कारवाई दहशतवादी संघटनांच्या वाढत्या हालचालींवर लगाम घालण्यासाठी महत्वाची ठरणार आहे अशा कारवायांमुळे राज्यात शांतता प्रस्थापित करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.