देशात सध्या बेकायदेशीर मार्गाने वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले असून, अनेक घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या लोकांची कागदपत्रे तपासली असता, अनेक बांगलादेशी नागरिक भारतात कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्रातही मोहिमेला गती, विक्रोळीत १३ बांगलादेशी ताब्यात
या राष्ट्रीय मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनीही कारवाईला गती दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बेकायदेशीर घुसखोरांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी विविध तहसील कार्यालयांना भेट देऊन बोगस जन्मप्रमाणपत्रांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. २७ एप्रिल रोजी किरीट सोमय्या यांनी पोलिसांसोबत मुंबईतील विक्रोळी मार्केटला भेट दिली. यावेळी डझनभर बांगलादेशी फेरीवाले तिथे आढळून आले. या फेरीवाल्यांकडे असलेली कागदपत्रे तपासल्यानंतर अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्या.
बोगस आधार कार्ड आणि एकसारखी जन्मतारीख
या बांगलादेशी फेरीवाल्यांकडे असलेली आधार कार्डे बनावट असल्याचा संशय आहे. सर्व आधार कार्डांवर ०१ जानेवारी हीच जन्मतारीख नमूद आहे आणि पत्ता साहेबगंज, झारखंडचा आहे. यामुळे या कागदपत्रांच्या खोटेपणाबद्दल मोठा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ज्यांची नावे पुढे आली ती बांगलादेशी नावे आणि जन्मतारीखा खालीलप्रमाणे:
जियाउल शेख – ०१/०१/१९८०
अयुब शेख – ०१/०१/१९७६
मनोरूल शेख – ०१/०१/१९९५
सायम शेख– ०१/०१/२००३
नईम शेख – ०१/०१/२००३
सामून शेख – ०१/०१/२००३
रफीकुल शेख – ०१/०१/१९८८
जहाँगीर शेख– ०१/०१/२००७
नसीमा बिबी – ०१/०१/१९८३
मैनुद्दीन शेख – ०१/०१/२०००
बरीउल शेख – ०१/०१/२००३
हलीम शेख– ०१/०१/२००६
कासूद शेख– ०१/०१/२००४
या सर्व घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यात अधिक घुसखोर असल्याचा अंदाज
या प्रकरणावरून असे दिसते की, अशा प्रकारचे बेकायदेशीर नागरिक राज्यात विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले असू शकतात. किरीट सोमय्या यांनी याविरोधात अधिक तीव्र कारवाईची मागणी केली असून, पोलिसांनी राज्यभर शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
विक्रोळी पोलिस स्टेशनने 13 बांग्लादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले
आज 27 एप्रिल सकाळी 11 वाजता पोलिसांसह आम्ही विक्रोळी मार्केटला भेट दिली आणि तिथे असे डझनभर बांग्लादेशी फेरीवाले आढळले, ज्यांच्या आधार कार्डवर जन्मतारीख 01/01… म्हणजेच 01 जानेवारी लिहिलेली आहे
सर्व आधार… pic.twitter.com/PBgFzqJcTB
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 27, 2025