‘जोपर्यंत भारतातील शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात येत नाही, तोपर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निक्षून सांगून देखील काँग्रेसने फाळणीला मान्यता का दिली असा सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थितीत केलेला हा सवाल आजच्या घडीला किती महत्वाचा होता हे आपल्याला दिसते .
फाळणीनंतर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम हे भारतातच राहिले. हे मुस्लिम जरी भारतात राहत असले तरी त्यांच्या मनात आजही पाकिस्तानवरचे एक सुक्त प्रेम दिसून आले आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतात ठीक-ठिकाणी पाकिस्तानविरोधात आंदोलने करण्यात आली. या आंदोलनावेळी पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवण्यात आला. या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओ दिसत आहे की, काही मुस्लिम महिलांना पाकिस्तानच्या झेंड्याचा अवमान सहन झालेला नाही. त्यांनी ते झेंडे उचलत आंदोलकांना आम्ही शांत आहोत हर तुम्हाला सहन होत नाही का? असे म्हणत सगळे पाकिस्तानचे झेंडे उचलून आपल्या हृदयाशी लावून त्या तिथून निघून गेल्या. आता असाच प्रकार जर पाकिस्तानात राहणाऱ्या एखाद्या हिंदूने केला असता तर त्याचे काय हाल झाले असते हे न सागितलेलंच बरं…
https://x.com/DuddakuntaBJP/status/1916017357979529355
दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानातील अनेक महिला भारतीय पुरुषांसोबत लग्न करून भारतात स्थायिक झाल्या आहेत. पाकिस्तानातील आर्थिक स्थिती पाहता तिथे महिलांना मिळत असलेली वागणूक, महिलांचा छळ, अधिकार या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील महिला भारतात पळून येऊन भारतीय पुरुषांशी लग्न करून ठीक-ठिकाणी स्थायिक झाल्या आहेत. पाकिस्तान सोडून आलेल्या या महिला असो किंवा मग भारतीय मुस्लिम असो…किंवा मग कश्मिरी मुस्लिम असो…आजही त्यांच्या मनात पाकिस्तानविषयी प्रेम आहेच. पाकिस्तान विषयीचे हे प्रेम पाहता घरात घुसलेल्या या शत्रूंशी भारत कसे लढणार ? हा मुद्दा भाजप नेते जेष्ठ निशिकांत दुबे यांनी उपस्थित केला आहे.
निशिकांत दुबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत पाकिस्तानातून भारतात आलेल्या मुस्लिमांवरहे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे की , ‘सुमारे पाच लाख पाकिस्तानी महिला भारतात लग्न करून राहत आहेत. पण त्यांना आजपर्यंत भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. त्यामुळे हीही चिंतेची बाब असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी याला ‘अंतर्गत शत्रू’ म्हणत सरकारला या विरोधात ठोस पाऊले उचण्याची गरज असल्याचे सांगितले.
https://x.com/nishikant_dubey/status/1916684090419331428
खरं तर जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत भारतामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार अनेक राज्य सरकारांनीही कारवाईला सुरुवात केलीआहे.
यादरम्यान, पाकिस्तानातील पाच लाखांहून अधिक महिला भारतात असल्याचा धक्कदायक दावा करण्यात निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसेच दहशतवादाचा हा नवा चेहरा आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दुबे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की, “पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवा चेहरा आता समोर आला आहे. ‘भारतीयांशी लग्न करून पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात राहत आहेत. आजपर्यंत त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. निशिकांत दुबे यांनी पुढे असेही म्हंटले आहे की, घरात घुसलेल्या या शत्रूंशी कसे लढायचे? हा प्रश्न मोठा आहे.
आता निशिकांत दुबे यांनी केलेला हा दावा खरा ठरला तर ही खरच चिंतेची बाब आहे. कारण बाहेरील शक्तींसोबत लढणे एवढे अवघड नसते जेवढे अंतर्गत शक्तींसोबत असते. त्यामुळे निशिकांत दुबे यांच्या दाव्यात सत्यता असेल तर भारत सरकराने व राज्य सरकारने यावर ठोस पाऊले उचण्याची गरज आहे.