Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ गुहेमध्ये होते. ही गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे 13,600 फूट उंचीवर आहे. ही गुहा हिंदू धर्मातील एक पवित्र तीर्थस्थान मानली जाते. कारण अमरनाथ गुहा ही भगवान शंकराच्या प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक आहे. येथे नैसर्गिकरित्या बर्फापासून शिवलिंग तयार होते, ज्याला ‘स्वयंभू’ शिवलिंग म्हणतात. त्यामुळे लाखोंच्या संख्येने शिवभक्त अमरनाथ यात्रेला येतात. यंदा अमरनाथ यात्रा यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार आहे तर 9 ऑगस्ट रोजी संपणार आहे. परंतु पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ही यात्रा रद्द होईल की काय अशी शंका उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण अमरनाथ यात्रेचे स्थान, याआधी अमरनाथ यात्रेवर हल्ले झाले आहेत का?, सध्याची स्थिती काय याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
अमरनाथ यात्रेचे स्थान:
अमरनाथ यात्रा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ गुहेमध्ये होते हे तर आपण जाणतोच. परंतु या यात्रेला जाण्यासाठी केवळ दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे जिथे दहशतवादी हल्ला झाला आहे ते पहलगाम आणि दुसरे बालटाल. हे दोन मार्ग असले तरी अनेकजण पहलगाम मार्गाला प्राधान्य देतात, कारण तेथे गुफा जवळचा मार्ग आहे आणि तेथे वाहतूक देखील चांगली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पहलगाममध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे जरी अमरनाथ यात्रा झाली तरी भाविकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारची भूमिका काय:
पहलगाम हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेवरून विविध चर्चांणा उधाण आलेले असताना आता जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी यात्रेबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सुरिंदर चौधरी यांनी म्हटले आहे की, सुरिंदर चौधरी यांनी म्हटले आहे की, श्रद्धाळूंनी घाबरण्याची गरज नाही. तसेच या यात्रेसाठी नवी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अर्थातच सध्या तरी अमरनाथ यात्रा रद्द होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भाविकांनी काळजी करण्याचे कारण नाही.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेदरम्यान सुरक्षा कशी असेल:
-यात्रेच्या मार्गावर आणि आसपास अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यामध्ये लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश असणार आहे.
– अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि इतर पाळत ठेवण्याची उपकरणे लावली जातील. ज्यामुळे संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येईल.
– यात्रेच्या मार्गांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे नियम अधिक कठोर केले जातील. विशिष्ट मार्गांवरूनच भाविकांना परवानगी दिली जाईल.
-यात्रेकरू आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जाईल. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित कारवाई केली जाईल.
-प्रत्येक यात्रेकरूला एक रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड दिले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे यात्रेकरूंची स्थिती आणि हालचाल सहजपणे ट्रॅक करता येऊ शकते.
-कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित कारवाई करण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथके तयार ठेवली जातील.
यापूर्वी अमरनाथ यात्रेवर झालेले हल्ले:
-२००० मध्ये अमरनाथ यात्रेवर सर्वात मोठा हल्ला झाला होता. हा हल्ला ‘अमरनाथ हत्याकांड’ म्हणून ओळखले जातो. या हल्ल्यात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला होता, तर 62 जण जखमी झाले होते. हा हल्ला अनंतनाग आणि डोडा जिल्ह्यात झाला होता. इस्लामी अतिरेक्यांनी हा केल्ला होता, अशी माहिती उपलब्ध आहे.
– २००१ मध्ये शेषनाग तलावाजवळील यात्रेकरूंच्या शिबिरावर हल्ला झाला होता. दोन स्फोट आणि गोळीबार झाला होता. अमरनाथ यात्रेवर झालेल्या या हल्ल्यात १३ यात्रेकरू शहीद झाले आणि १५ जण जखमी झाले होते.
-२००२ मध्ये अमरनाथ यात्रेवर दोन मोठे दहशतवादी हल्ला झाला होता. यात एका हल्ल्यात ११ यात्रेकरू ठार झाले होते तर अनेक जण जखमी झाले.
– २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ यात्रेकरू ठार झाले होते आणि अनेक जण जखमी झाले.
दरम्यान, अमरनाथ यात्रेवर होणारे हल्ले हे नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे यंदाच्या अमरनाथ यात्रेविषयी विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. पंरतु अद्याप तरी अमरनाथ यात्रा होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे.