पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते रोजगार मेळ्याअंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या ५१,००० तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ही नियुक्तीपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली. पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या ५१ हजार तरुणांना हे नियुक्ती पत्र दिले गेले.
हैदराबादमध्ये आयोजित या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित केले. या दशकात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल; ही हमी मी पूर्ण जबाबदारीने देतो. “व्होकल फॉर लोकल या मंत्राला अनुसरून भारत सरकार मेड इन इंडिया लॅपटॉप, संगणक यांसारख्या उत्पादनांच्या खरेदीवर भर देत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली असून, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
देशभरात ४५ ठिकाणी या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सरकारने निमलष्करी दलांच्या भरती प्रक्रियेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.यावेळी मोदींनी प्रधानमंत्री जन धन योजनेचाही उल्लेख केला आणि सांगितले की, खेडेगाव आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात तसेच रोजगार निर्मितीमध्ये या योजनेने मोठी भूमिका बजावली आहे.