गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. येणारा गणेशोत्सव दणक्यात पार पडणार असून यासाठी शहरातील पोलीस प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी माध्यमांना दिली. दरम्यान गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असून यामुळे गणेश भक्तांना फायदा होणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी गणेश मंडळांनी नियम पळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर वेळेत विसर्जन होण्याच्या हेतूने दगडूशेठ गणपतीची मिरवणूक दुपारी ४.३० वाजता निघणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर लवकरच दहीहंडी उत्सव आहे, उत्सवाचा आनंद घेताना गोविंदा पथकांनी काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे देखील आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.