बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उमटलेले बघायला मिळाले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला.राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार असा उल्लेख करत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्यात आला.तसेच कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बीड इथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील.तर आम्ही ते खपवून घेणार नाही.आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही.त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच,असा इशारा सुहास देसाई यांनी यावेळी दिला आहे
Tags: NULL