परभणी : मागील पिढीने जो दुष्काळ पहिला आहे तो पुढील पिढीला पाहू देणार नाही; पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात आणायचे आहे असे आश्वासन परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नागरिकांना दिले. दरम्यान एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस झाल्यास तिथले पाणी दुसऱ्या भागात वाहून नेण्यात येईल असे फडणवीस यावेळी म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीनुसार मराठवाड्यात आजतागायत ५० टक्के पाऊस झाला असून मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करायचे आहे, यासाठी काही उपाय योजना केल्या असून या अंतर्गत ग्रीड योजना मराठवाड्यात आणली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडली जाणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.